Shraddha | श्रद्धा

By // No comments:
माणूस एक श्रद्धाशील जीव आहे. आपला इहलोकीचा प्रवास सुखावह व्हावा, ही अपेक्षा त्याच्या मनात कायमच असते. या आस्थेतून अनेक श्रद्धा त्याच्या अंतर्यामी उदित होतात. श्रद्धेतून मिळवलेल्या पावलापुरत्या प्रकाशात तो जीवनाची वाट शोधीत असतो. जीवनाविषयी, जीवनाशी निगडित श्रद्धा जोपासत त्याची इहलोकीची यात्रा अनवरत सुरु आहे. आदिम अवस्थेतील सुविधांचा अभाव असणाऱ्या जगण्यापासून, तर आजच्या सुविधांनीमंडित जगण्यापर्यंत त्याला सोबत करणाऱ्या श्रद्धा आणि त्यातून निर्मित विचारधारा हेच प्रगतीचे गमक आहे, असे समजून तो आपले परगणे निर्माण करीत आहे. त्या प्रदेशांपर्यंत पोहचण्याचे पथ तयार करीत आहे. आपल्यापुरत्या अभ्युदयाच्या संकल्पना तयार करून जीवनाची वाट चालतो आहे. जन्माला आलेल्या साऱ्या जिवांची जगण्याची धडपड ही नैसर्गिक, स्वाभाविक, सहज प्रवृत्ती आहे. माणसाव्यतिरिक्त असंख्य...

Prashna...? | प्रश्न...?

By // No comments:
‘का, कसे, कुठे, कधी, केव्हा, कोणता’ या शब्दांना भाषिक व्यवहारात नेमके कोणते स्थान आहे. हे शब्द भाषेत कसे आले असतील? हे शब्द नसते तर काय घडले असते? खरंतर या शब्दांविषयी लिहितानाही प्रश्न चिन्हांकित वाक्ये तयार होत आहेत. प्रश्नांची निर्मिती हेच या शब्दांचे काम आहे. माणसं प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघतात. मिळतात कधीतरी त्यांची उत्तरे सहज. कधी वणवण भटकतात. लागली उत्तरे हाती तर आनंदतात. पण हा आनंदही तसा क्षणिकच असतो, कारण पुढच्या पावलावर दुसरा प्रश्न असतोच उभा. माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? हा प्रश्नसुद्धा आपणासमोर अनेक पर्यायात उत्तरे आणतो. कोणाला काय महत्वाचे वाटेल, कसं सांगावं? मला वाटतं माणसांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट ‘प्रश्न’ हीच असावी. कारण माणसांना प्रश्नच पडत गेले नसते तर...! त्याला प्रगतीची शिखरे गाठता आली असती...