हरवलेले गंधतत्त्वांच्या ठायी असणारे सौजन्यचौकटी नसणाऱ्या कोपऱ्यात ढकलता येतंसमर्थनाचे पलिते पेटवून अभिसरणाच्या वार्ता करणाऱ्याकुठल्याही आवाजाला अगदी सहजविचारांना अभिनिवेशाचे साज चढले कीप्रतिमा पूजनीय अन् प्रतीके अस्मिता होतातअभिमान, स्वाभिमानाच्या परिभाषित अंमलातचौकटींनाही झिंग चढते वेगळं असण्याचीत्यांनाही अलौकिक अस्तित्व असल्याचा अवकाळी साक्षात्कार घडतोमाणसाला धर्म अफूची गोळीअसल्याचा साक्षात्कार झाला कधीतरीपण धर्मच मॅगझीनात येईल, हे तरी कुठे ठाऊक होते कोणालाअतिरेकाला बेगडी तत्त्वात स्थापित करायचं ठरवलं कीशतकांच्या पसाऱ्यातून समर्थनाचे मुद्दे उपसून काढता येतात सोयीचे अर्थ लावून नेमके खरंतर भुकेचा प्रश्न समोर असणाऱ्यांचाएकमेव धर्म भाकरी असतेपण भाकरीला लागलेल्या ग्रहणाची गणितेआकळत नाहीत तेव्हा संवेदनांचे गंध हरवत जातात अन् पळत राहतात वैराण...