शोध

By // No comments:
माणसाचं जगणं एक शोधयात्रा आहे. इथे प्रत्येकाला काहीना काहीतरी हवंय आणि ते मिळवण्याची आस अंतरी अनवरत अस्तित्वात आहे आणि शोधण्यासाठीची धडपडही. कुणाला सुखांचा शोध घ्यायचा, कुणाला समाधानाची नक्षत्रे वेचून आणायची आहेत, कुणाला पैसा शोधून गाठीला बांधायचा आहे, कुणाला प्रतिष्ठेचे परगणे खुणावत आहेत, कुणाला पदप्राप्ती करून आपलं वेगळं असणं अधोरेखित करायचं आहे. कुणाला प्रेमाच्या परिभाषां अवगत करून घ्यायच्या आहेत. कुणाला आणखी काही... एकुणात इहतली असा कोणताही जीव नाही, ज्याला काही मिळवायचं नाही. निसर्गाने निर्धारित केलेल्या अन् देहधर्माशी निगडित गोष्टीही काहीतरी हवं असणं असतंच ना! जगण्यासाठी लागणारे श्वाससुद्धा या धडपडीचं रुपच. भले ते स्वाभाविकतेचे किनारे धरून सरकत असतील. आपल्याकडे काहीतरी असावं, ही आस अंतरी घेऊन सगळेच नांदत आहेत येथे. कोणी मोहापासून अंतरावर...

पेच

By // 5 comments:
काही दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. माझ्या एका स्नेह्याच्या जगण्याला एका आगंतुक समस्येने वेढलं. अनामिक वाटेने चालत आलेल्या अनाहूत प्रश्नाच्या चिन्हांनी ग्रासलं. निमित्त काही फार मोठं होतं असंही नाही. लहानमोठे प्रापंचिक पेच सगळीकडेच असतात. याच्याकडेही असा एक गुंता तयार झाला. अर्थात, तो काही फार जटिल नव्हता. प्रासंगिकच होता. खरंतर खूप विचलित वगैरे होण्यासारखा प्रश्न समोर नव्हता अन् उत्तरही अतिशय अवघड होतं, असंही नाही. पण अंतरी अधिवास करणारे अहं अधिक टोकदार झाले की, त्याच्या जखमा सांभाळण्याचीही तयारी असायला लागते. विचारांनी ‘मी’पणाच्या रंगानी मंडित झुली परिधान केल्या की, आसपासचे सगळेच रंग नजरेला विटलेले दिसतात. याचंही असंच झालं. वादाला कोणतीतरी निमित्त हवीच असतात. ते मिळालं. कारण ठरलं, वयात आलेलं त्याचं पोरगं... वयात आलेलं पोरगं म्हटल्यावर उगीचच...