कळणे अन् वळणे

By // 3 comments:
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझा एक स्नेही भेटला. मी लिहिलेला कुठलातरी लेख त्याच्या वाचनात आला असावा. त्या संदर्भांचे सूत्रे हाती घेऊन इकडचं-तिकडचं सांगून पार्श्वभूमी तयार करण्याच्या भानगडीत न पडता लेख आवडल्याचं आधीच सांगून औपचारिक सोपस्कारांना विराम देवून मोकळा झाला. पण तेवढ्यावर त्याचं समाधान होतंय कसलं! कदाचित त्याच्या मनात उदित झालेले प्रश्न अस्वस्थपणाच्या रेषा ओढत असतील. गडद होत जाणाऱ्या संदेहाच्या अक्षरांना शक्य तेवढे पुसून मनाची पाटी कोरी करण्याचा प्रयत्न करूनही उत्तरांचा पर्याप्त पर्याय काही हाती लागत नसेल. सगळे पर्याय पाहून पुरे झाले असावेत, म्हणून कुणाला तरी गाठायचं असेलच त्याला. केवळ योगायोगाने मी नेमका गवसलो. तसंही माध्यमांच्या सुलभीकरणामुळे कुठल्यातरी नियतकालिकात, वर्तमानपत्रात लिहणं सध्या बऱ्यापैकी सामान्य गोष्ट झाली आहे. लिहिणाऱ्या...

अग्निकुंड

By // 2 comments:
अग्निकुंड: प्रवास एक वेदनेचा काही गोष्टी कळत घडतात, काही नकळत. जाणतेपणाने घेतलेल्या निर्णयांना निदान विचारांचं अधिष्ठान असल्याचं तरी सांगता येतं; पण काही गोष्टी अशाही असतात, ज्यांना गृहीतही धरता येत नाही अन् अधोरेखितही करता येत नाही. जाणते-अजाणतेपणा म्हणावं, तर समर्थनासाठी तीही बाजू शिल्लक नसते. नाहीतरी सगळ्याच गोष्टी मनात आखून घेतलेल्या चौकटींमध्ये पद्धतशीरपणे बसवता कुठे येतात? त्यांचं असणं शाश्वत असतं अन् ते नाकारून पुढचे पर्याय शोधण्यात काही अर्थ असतात असेही नाही. आल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प हाती नसतात. सगळे पर्याय संपले की, सूत्रे नियतीच्या हाती सोपवण्याशिवाय उरतेच काय? तसाही माणूस किती स्वतंत्र असतो? स्वातंत्र्याच्या परिभाषा कोणी काहीही केल्या म्हणून काही, ते आहे तसे आणि हवे तसे आयुष्याच्या चौकटीत येवून सामावत नाही....