कविता समजून घेताना... भाग: पाच

By // 4 comments:
 कसं जगायचं आम्ही?कसं जगायचं आम्ही?तुम्ही वावर घेताय,म्हणजे नुस्तं वावर घेतायं का?वावर म्हणजे नुस्ती जमीन,नुस्ती लॅण्ड नाही हो सरकारमाझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलयं, इतिहासयं,सगळी शास्र, पुराणं, सगळं सगळंय हो!दुर्बिनीनं नका बघू,माझ्या नजरेनं बघा ना- नजरेच्या एका टप्प्यात अख्खं वावर... मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या...अन् तुम्ही अचानकसंपादन करणार या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्यागर्भाशयाचं?- केशव खटिंग••भारत कृषिप्रधान देश आहे. पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. घडवलं आहे. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ म्हणत लोकांना या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. खेडी घडली तर देश घडेल, या विचारातून कदाचित हे सगळं असेल. पण उक्ती आणि कृतीत अंतराय आले की, गांधींसारख्या महात्म्याच्या विचारांचा...

कविता समजून घेताना... भाग: चार

By // 1 comment:
एका शिक्षकाची कैफियत खरं सांगतो-मुलं गृहपाठ करत नाहीत यात माझा दोष नाही !या शतकाचाकोरा कागद त्यांच्या लेखणीला झिरपू देत नाही मुलं प्रार्थनेवेळीहात जोडत नाहीत यात माझा दोष नाही!त्यांच्या श्रद्धेचे दिवे तेवते ठेवतील असं या देशाचं वर्तमान नाही मुलं भटकतात शहरभर पाहतात... ऐकतात... हाताळतात... वाचतात... टीव्ही, कॉम्प्युटरकॅलक्युलेटर, डेली पेपर यात माझा दोष नाही!या चार भिंतीत आता त्यांचा जीव रमत नाहीमुलं असंबद्ध... अवांतर बडबडतात काहीबाही शालेय परिसरात यात माझा दोष नाही!हे शहर... ही शाळा त्यांच्या स्वीकार-नकारांशी जुळवून घेत नाही अगदी खरं सांगतो- या मुलांनी आता ही शाळा... हे शहर... हा देश पेटवला तरी माझा अजिबात दोष नाही! मी शिकवीन ते त्यांनी आत्मसात करावं अशी आज तरी त्यांच्या भोवती परिस्थिती नाही...- अशोक कोतवाल   ••विद्यार्थी...