पासबुकघरातल्या जुन्या पेटीतकप्प्यातएक पासबुक असायचंबापाच्या नावाचंनिळ्या रंगाचं कव्हरलक्ष्मीचं चित्रनि सोनेरी अक्षरातदेना बँक लिहिलेलंकुतूहलापोटीकधी-कधी पेटी उघडायचोनि पासबुक चाळायचोएकटाचएक नोंद दिसायचीआठेक वर्षांपूर्वीचीपाच हजार जमा होऊनचार नऊशे काढल्याचीशंभरशिल्लक दाखवणारीती नोंदकाळाच्या माऱ्यानंपुसट होत चाललेलीबापलाविचारलं तर सांगायचाकर्ज काढल्याचंनि सातबाऱ्यावर बोजा चढल्याचंपुढं ते पासबुक जीर्ण होत गेलंकुठल्याही नोंदीविनानि गुडूप झालंकाळाच्या उदरातउरला फक्त बोजाजीवाला घोर लावणाराबापाच्या उरावरआयुष्यभर- दा. रा. खांदवे*शेती, शेतकरी या शब्दांभोवती अर्थांचे अनेक दृश्य-अदृश्य वलये आहेत. कुणाला हे जगण्याचे स्त्रोत वाटतात, कुणाला त्यात अस्तित्वाचे अनुबंध दिसतात. तर कुणाला आयुष्याचे आदिबंध त्यात अनुस्यूत असल्याचे वाटते. कोणाला काय वाटावे, हा भाग...