जेव्हा आपण आजच्या काळात...जेव्हा आपण कुलकर्णी असतोतेव्हाही असतात आपल्यालातितकेच प्रॉब्लेम्सजितके असतात कांबळे असतांनाकधी कधी गुप्ता असणंसोयीचं ठरतंचौबे असण्यापेक्षादेशपांडेलामी बारमधे पाहिलयं वेटर म्हणूनअन्वाल्मिकलाटेबलवर ऐसपैस बसून पेग मारतानाआपण मेहरा असतो तेव्हाहीआभाळ असतं डोक्यावरचअन्फर्नांडीस असतो तेव्हाहीजमीन असते पायाखालीचप्रत्येक वेळेस ठाकरेच येईल कामात असं नसतंतरअन्सारीही डोळे पुसून जातो कधीकधीनावात काय आहे?चला जगूया,नावाशिवाय...- किशोर मुगल•‘नावात काय असतं?’ हे प्रश्नार्थक विधान शेक्सपिअरचा हवाला देवून आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणीतरी सांगत असतो. शेक्सपिअर असं काही म्हणाला असेल की नाही, माहीत नाही. आपण मात्र तो आपल्या समक्ष उभा राहून अगदी असंच म्हणाला, या आविर्भावात सहजपणे सांगत असतो. अर्थात, असं सांगण्यात काही वावगं आहे असंही...