अॅडम अॅण्ड इव्हचल...पुन्हा एकदापरत जाऊत्या आदिम अवस्थेकडेजिथं सृष्टीत फक्ततू आणि मी...प्युअर अॅण्ड व्हर्जिनउतरून टाकूहा बुरखातुझ्या पुरूषी अहंकाराचा,दंभाचाअन् माझ्या आत्मभानाचाहीवरकरणी तसेहीकितीही विस्तारलोत आपणतरी कायमच राहतोयएक हळवा कोपरा अपूर्णतुझ्याशिवाय माझ्यातअन्माझ्याशिवाय तुझ्यातही!विद्या बायस-ठाकूर•तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील अक्षरे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या अंधारात चाहूल लागते. कुतूहलाचा एक कवडसा डोकावून पाहतो. विसकटलेले, विखुरलेले संदर्भ जागे होतात अन् चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कुशीत...
कविता समजून घेताना भाग: चौतीस
डाव संसाराचाआभाळ कोपल्यावर तू कच खाल्लासअन् दोर तोडत गेलास संसाराचीमी गणितं घालत होते उद्याचीतुझ्या वजाबाकीला बेरजेत आणण्याचीसंसाराचा डाव मांडलास तूचमग का उधळून लावलास?पाखरांना जेव्हा गरज होतीतेव्हाच तू गळफास घेतलाससंसाराचा पसारा आताएकटीने कसा आवरूथेंबाथेंबाने गळणाऱ्या घरालाफुटक्या मनगटाने कसे सावरू?जन्मदात्या बापाची काठी व्हायचेतर पळपुट्यासारखे पळून गेलासरडले तर सगळेच रे!मला मात्र एकांतात छळून गेलाससमाजाला, व्यवस्थेला तोंड देतएकटीच मी लढते आहेपोटच्या पोराला मात्रलढवय्या म्हणून पाहते आहेकेविलवाणी धडपड माझीडोळ्यात मात्र आशेचा किरण आहेमाझ्या एकटीच्या लढाईलातुझ्या मायबापाची प्रेरणा आहेकाजवा होऊन लढत राहीनमला सूर्याची फिकीर नाहीआभाळाला जाऊन सांगआतामाझ्या सोबतीला आहे काळी आईअनिता यलमटे•भविष्याच्या धूसर पटलाआड नेमकं काय दडलेलं असतं, हे काळालाही...
कविता समजून घेताना भाग: तेहतीस
झऱ्याजवळच होते राहतझऱ्याजवळच होते राहतपण घडे भरूनघेतलेच नाहीतनदी तर वहातहोती शेजारूनचकाठाकाठानेचराहिले हिंडतपाऊस कोसळायचाघरांभोवतीधुवांधारआंत आंतकोरडीच रहात गेलेकोरडीचफुलवले फुलांचेताटवे सभोवतीएकही फूल नाहीमाळू शकले केसांतदवबिंदूंना राहिले गोंजारीतपण म्हणावी अशीभिजलेच नाहींभिजलेच नाहींसाऱ्या ऋतूंनीआपलं मानलंमाझ्याभोवतीफेर धरला सततमी मात्र एकाकीचहोत गेलेएकाकीच...एकाकीच...!प्रा. डॉ. सौ. रामकली पावस्कर •आयुष्य असा एक शब्द ज्याचा अर्थ शोधत निष्कर्षाप्रत पोहचण्यास आयुष्य अपुरे पडते. पण याचा अर्थ असा नाही की, त्याचे अर्थ शोधण्याचा प्रयास कोणी केला नाही. सृष्टीत सर्वत्र कुतूहल पेरलेलं आहे. ते वाचायचं. वेचायचं. त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी मनाच्या मातीत आकांक्षेचे अंकुर रुजवता यायला हवेत. तेवढा ओलावा अंतरी जपता यावा. समाधानाचा सांगावा घेऊन येणाऱ्या...
कविता समजून घेताना भाग: बत्तीस
आरसे दिपवून टाकतात डोळेपरीक्षानळी बदलल्याने वाकागदावरचं सूत्र मागेपुढे फिरवल्यानेरिझल्ट बदलत नसतो रासायनिक समीकरणाचाहे पक्क ठाऊक असूनसुद्धाआरसे चमकवले जातात विशिष्ट वेळानेशेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरअन् दिपून जातात काचबिंदू झालेलेगारगोटीगत डोळेनितळ पाण्यात दिसावा तळअथवा झिरझिरीत कपड्यातदिसावेत नटीचे योग्य उंचवटेएवढं स्पष्ट उत्तर दिसत असूनसुद्धागणित अधिक किचकट केलं जातंयदिवसेंदिवस शेतीचंलाखो हेक्टरवर पसरलेलाहा करोडो जीवाचा कारभारहजारो वर्षापासून जगतोयआपल्या मूळ अस्तित्वासहहे दुर्लक्षून दिली जातायत त्यांच्या हातातहायब्रिड, बीटीसारखी इंग्लिश नावाची वाणंत्यांनी कसा घालावा ताळमेळया ब्रँडेड बियाणांचा अन् उकिरड्यावरच्या शेणखताचाफुगत चाललेल्या ढेरीगत वाढणाऱ्याऔषध खताच्या किमतीउठताहेत शेतकऱ्याच्या जिवावरअन् त्यातील विषारी घटक पिकावरधर्मभेद अन् प्रांतभेदाचं...